
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्ग कायम न ठेवावा, ही मागणी करीत क्रांती दिनाचे औचित्य साधून रविवारी सिन्नरच्या गोंदे फाटा येथे वे चक्काजाम करण्यात आला. शिवसेना खासदार राजाभाऊ वाजे आणि आमदार सत्यजित , तांबे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. हजारो नागरिक रस्त्यावर उतरल्याने र दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. रेल्वे मार्गासाठी ३ जिल्ह्यांत आज आंदोलन झाले.
आंदोलकांकडून समृद्धी महामार्ग अडवण्याचा प्रयत्न
रविवारी सकाळी सिन्नर, नाशिक, अहिल्यानगरच्या अकोले, संगमनेर तालुक्यातील हजारो रहिवासी रस्त्यावर उतरले. समृद्धी महामार्ग अडविण्यासाठी या महामार्गावर जाण्याचाही आंदोलकांनी प्रयत्न केला. पोलिसांनी आमदार सत्यजित तांबे यांना ताब्यात घेतले. कुठल्याही परिस्थितीत या मूळ मार्गात बदल खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा खासदार राजाभाऊ वाजे यांनी दिला.
हा सेमी हायस्पीड प्रकल्प सोळा हजार कोटींचा आहे. भूसंपादन प्रक्रिया होऊन पाचशे कोटींहून अधिक रुपयांच्या निधीचे वाटप झाले आहे. नारायणगाव येथील जागतिक दर्जाच्या जीएमआरटी दुर्बिणीला धोका निर्माण होत असल्याचे कारण पुढे करून रेल्वे मंत्रालयाने मूळ मार्ग बदलण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे पुणेपासून नाशिकपर्यंत लाखो नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. बदल न करता मूळ मार्ग कायम ठेवावा यासाठी क्रांती दिनाचे औचित्य
साधून ठिकठिकाणी रास्ता रोको करून चक्काजाम करण्यात आला. खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नरच्या गोंदे फाटा येथे आंदोलन करण्यात आले.
मंत्री गिरीश महाजन यांनी मोबाईलवरून तांबे यांच्याशी संपर्क साधला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या समितीचा अहवाल हा साठ दिवसांत यावा, या समितीला मुदतवाढ देऊ नये, असे तांबे यांनी महाजन यांना सांगितले.





























































