25 फूट उंच झाडाच्या फांदीवरच बिबट्याचा मृत्यू, झाडावर वाघाच्याही खाणाखुणा नेमकं काय घडलं ?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्हातील ब्रह्मपुरी वन विभागांतर्गत येणाऱ्या तळोधी नियतक्षेत्रातील एका उंच झाडावर सोमवारी सकाळी एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याचे एकच खळबळ उडाली आहे. वन कर्मचाऱ्यांच्या निदर्शनात आले.हे झाड चाळीस फूट उंचीचे होते. या झाडाच्या फांदीवर बिबट्या मृताअवस्थेत पडलेला होता.

ही फांदी 35 फूट उंचीवर होती.तळोधी बाळापूरचे वन कर्मचारी सोमवारी सकाळी कॅमेरा ट्रॅपचे फोटो बघायला गेले होते.तिथं त्यांना दुर्गंधी आली.त्यांनी आजूबाजूला पाहणी केली. तेव्हा महसूल विभागाच्या गट क्रमांक 64 मध्ये एका 45 फूट उंचीच्या बेहडा जातीच्या झाडावर 35 फूट उंचीवर असलेल्या एका फांदीवर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. घटनेची माहिती तळोधी बाळापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी आरूप कन्नमवार यांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळ गाठले. दोराच्या मदतीने झाडावर चढले अन मृत बिबट्याला खाली उतरविले. मृत बिबट्या मादी आहे. तिचे वय साडेतीन ते चार वर्षे असल्याचे वनविभागाने सांगितले.

ज्या बेहडयाचा झाडाच्या फांदीवर बिबटा मृतावस्थेत आढळला होता त्या झाडाचाखाली वाघाचे पगमार्क आढळून आले.त्यामुळे वाघाने बिबट्याचा पाठलाग केला असावा. बचावासाठी बिबट्या झाडावर चढला. आणि त्याचा मृत्यू झाला.

हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू…

या बिबट्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने प्राण्यांचा मृत्यू होणे ही काही नवीन घटना नाही. बिबट्याचा नेमका मृत्यू कश्याने झाला हे शवविच्छेदन अहवालानंतरच कळणार आहे.