
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील औद्योगिक नगरी गडचांदूर येथील बसस्थानक परिसरातील संविधान चौकजवळील ‘भगवती NX’ या कापड दुकानात एका पिशवीत बॉम्ब ठेवल्याची माहिती आहे. पोलिसांना माहिती दिली असता त्यांनी ती पिशवी बाहेर काढली. चंद्रपुर येथील बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले असून कारवाई सुरू आहे. पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. हा परिसर सिल करण्यात आला असून गडचांदूर, कोरपनाचे ठाणेदार, नायब तहसीलदार, मंडळाधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहे. पिशवीत ठेवलेली वस्तू नेमकी काय यासाठी तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.