स्वामी बिअर बार दुकानाची खिडकी फोडून चोरांनी तब्बल तीन लाखांची दारू लंपास केली आहे. चंद्रपूर जिल्हातील मूल तालुक्यात येणाऱ्या डोंगरगांव येथे ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे या दुकानात ही तिसऱ्यांदा झालेली चोरी आहे.
दुकानाची खिडकी फोडून चोरांनी आत प्रवेश करून गोदामात ठेवलेला दारूच्या साठ्यावर डल्ला मारला. चोरी करतानाची घटना सीसीटीव्हीमध्ये मध्ये कैद झाली आहे. मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरांच्या वाढता उपद्रव जनतेसाठी डोकेदुखी ठरली आहे. घटनेची माहिती मिळताच मूल पोलीस घटना स्थळी पोहचत चोरांचा शोध सुरु केला आहे.