
चंद्रपूरमध्ये अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिग गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी 17 पिकअप वाहने पकडून 53 गोवंशाची सुटका केली आहे. या कारवाई दरम्यान 24 जणांना अटक करण्यात आली असून 1 कोटी 52 लाख 75 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करणअयात आला आहे. महाराष्ट्र-तेलंगणा सीमेजवळ नाकाबंदी करत ही कारवाई करण्यात आली आहे.
सचिन देवानंद नरोटे (वय – 25, आदिलाबाद), कृष्णा राम सुरनर (वय – 25, रा. जिवती), अलीम लतिफ सय्यद (वय – 22, रा. जिवती), नितीन राजेंद्र नरोटे (वय – 28, रा. जिवती), माधव बजरंग पेंदीलवार (वय – 29), दिगांबर मारोती रुंजे (वय – 46), नंदकिशोर रावसाहेब ऐतवाड (वय – 35), देवराव उत्तम तांबरे (वय – 36), गोवर्धन किसन चव्हाण, विनोद किसन राठोड, दीपक रामनाथ नरोटे (वय – 20), अभिषेक प्रेमदास पवार (वय – 21) माधव गोविंद पवार (वय – 36), उत्तम किसन राठोड (वय – 60), गोविंद प्रकाश पोले (वय – 32), अशोक अंकुश धुळगुंडे (वय – 24), विठ्ठल गोविंद मामीडवाड (वय – 25), विनायक रावसाहेब ऐतवाड, दानिश रसूल शेख (वय – 26), संतोष रामा थोरात (वय – 38), अझहर साबिर शेख (वय – 30), प्रवीण किसन जाधव (वय – 32), अंकुश मारोती नरोटे (वय – 32), परमेश्वर गुणाजी नरोटे (वय – 25), इंदल गणेश पवार (वय – 25) असे अटक करणाऱ्या आलेल्या आरोपींची नावे असून सर्व जण जिवती तालुक्यातील रहिवासी आहेत.
पहिलीच मोठी कारवाई
दरम्यान, महाराष्ट्र व तेलंगणा राज्याने एकत्रितरीत्या कारवाई करून एका वेळेस 17 पिकअप वाहने जप्त करून 24 जणांना गोवंशाच्या तस्करीत बेड्या ठोकल्याची ही जिल्ह्यातील पहिलीच कारवाई आहे. या कारवाईने गोवंश जनावरे कत्तलीसाठी नेणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.