चंद्रपूरला पावसाचा रेड अलर्ट, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हवामान विभागाने चंद्रपूर जिल्ह्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देत रेड अलर्ट जारी केला आहे. बुधवारी रात्रभर अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रपूर – नागपूर महामार्ग जलमय झाला. नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्क राहून अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.