चंद्रपूर – दोन ट्रकची समोरासमोर जोरदार धडक, चालक ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पहाटे फिरायला गेलेल्या तिघांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या घटनेत एक ठार तर दोघे गंभीर जखमी झालेत. या घटनेला तास उलटला नसताना दुसरी भिषण अपघाताची घटना चंद्रपूर-गडचीरोली महामार्गावर घडली आहे. सावली तालुक्यातील चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरील किसान नगर जवळ दोन ट्रकांची समोरासमोर धडक झाली. धडक ऐवढी जोरदार होती की ट्रकचा समोरील भागाचा अक्षरस चूराळा झाला. या धडकेत एक चालक जागीच ठार झाला. यानंतर काही वेळासाठी मार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती.

पोलीसांना घटनेची माहीती मिळताच, पोलासांनी घटनास्थळ गाठून मार्ग खुला केला. मृतकाचे नाव कळू शकले नाही. याच मार्गावरील व्याहाळ बुज येथिल फिरायला निघालेल्या तिघा मिंत्राना अज्ञात वाहनाने आज पहाटेला धडक दिली. या धडकेत दिपक दादोरीया घटनास्थळीच ठार झाला, तर अंकुश सोयाम,अक्षय रामटेके हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तिघेही सावली तालुक्यातील व्याहाळ बूज येथिल रहीवासी आहेत. घटनेतील जखमी तरूणांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे.