कोण म्हणतो, राज्यपालांनी शिवरायांचा अपमान केला? बावनकुळेंनी केली कोश्यारींची पाठराखण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोण म्हणतो, राज्यपालांनी शिवरायांचा अपमान केला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला धक्का बसेल, असं कोणतेही वक्तव्य केले नाही. कारण भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता शिवरायांच्या आदेशापासून प्रेरणा घेऊन काम करतो, असे सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोश्यारींची पाठराखण केली.

राज्यपाल कोश्यारी यांनी संभाजीनगर येथे पदवीदान समारंभात केलेल्या वक्तव्याचे कोणीही समर्थन करणार नाही. महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून कोश्यारी यांनी सदैव  शिवाजी महाराजांचा आदर केला आहे. शिवरायांच्या जन्मस्थानी नमन करण्यासाठी ते वयाच्या 79 व्या वर्षी शिवनेरी किल्ला पायी चढून गेले. पदवीदान समारंभात केलेल्या एखाद्या विधानावरून त्यांना कोंडीत पकडू नये, असेही बावनकुळे म्हणाले.