हिंदुस्थानचा बाहुबली चंद्राच्या दिशेने! चांद्रयान-2चे यशस्वी प्रक्षेपण

107

सामना ऑनलाईन । श्रीहरिकोटा

  • चंद्रही आता रंगणार तिरंग्याच्या रंगात – इस्रो
  • प्रक्षेपणानंतरही काही दिवस चाचण्या होत राहतील, इस्रोची माहिती
  • सप्टेंबर 2019पर्यंत चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचेल असा अंदाज आहे.
  • हिंदुस्थानचा बाहुबली म्हणवला गेलेला जीएसएलव्ही मार्क-2 अवकाशात झेपावला असून चांद्रयान २चे यशस्वी प्रक्षेपण झाले आहे.
  • हिंदुस्थानचा महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेला अवघी काही मिनिटे बाकी आहेत.
  • काही तांत्रिक बिघाडामुळे 15 जुलैला प्रक्षेपण न झालेले चांद्रयान-2 आता प्रक्षेपणासाठी पुन्हा सज्ज झाले आहे.
  • 15 जुलै रोजी पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी श्रीहरिकोटामध्ये सतीश धवन सेंटर येथील जीएसएलव्ही मार्क-3च्या मदतीने चांद्रयान-2 अवकाशात झेपावणार होते; परंतु तांत्रिक बिघाडामुळे प्रक्षेपणाच्या अवघ्या 56 मिनिटे आधी उड्डाण रद्द करण्यात आले.
  • हिंदुस्थानसह जगाचे लक्ष लागलेल्या चांद्रयान-2च्या प्रक्षेपणासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत.
आपली प्रतिक्रिया द्या