बदलत्या जीवनशैलीच्या आजाराचे लोण ग्रामीण भागापर्यंत, आरोग्य विभाग ऍलर्ट; ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ मोहीम सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, व्यसनाधीनता यामुळे शहरी भागांमधील महिलामध्ये जीवनशैलीशी निगडीत आजार वाढत असताना आता बदलती जीवनशैली व शहरीकरणामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्येही मधुमेह, रक्तदाब व पॅन्सरचे प्रमाण वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

राज्याच्या आरोग्य विभागामार्फत सध्या ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या विशेष मोहिमेअंतर्गत राज्यातील 18 वर्षांवरील महिला, माता गरोदर स्त्र्ाया यांच्या आरोग्याची सर्वांगीण तपासणीची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. नवरात्र उत्सवात या मोहिमेची सुरुवात झाली. सध्या दररोज आठ लाख महिलांची तपासणी करण्यात येत आहे.

राज्याच्या अठरा जिल्हय़ांतील आतापर्यंत 3 कोटी 95 लाख 14 हजार 627 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात 3 लाख 80 हजार 114 महिलांमध्ये उच्च रक्तदाबाचे निदान झाले तर तीस वर्षांवरील 2 लाख 29 हजार 550 महिलांमध्ये मधुमेहाचे निदान झाले.

या मोहिमेअंतर्गत 2 कोटी 52 लाख 5 हजार 637 गरोदर महिलांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1 लाख 38 हजार 856 गरोदर महिलांमध्ये रक्तदाबाची लक्षणे आढळली, तर 98 हजार 566 महिलांमध्ये तीव्र रक्तक्षयाचे निदान झाले. 2 लाख 27 हजार 543 महिलांची सोनोग्राफी करण्यात आली.

कॅन्सरचे वाढते प्रमाण
तीस वर्षांवरील 29 हजार 639 महिलांमध्ये हृदयाचे आजार, तर 52 हजार 568 महिलांमध्ये पॅन्सरसदृश लक्षणे आढळली. महिलांना आजार झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे.

मधुमेहमुक्त महाराष्ट्र
दरम्यान, मधुमेही रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन ‘मधुमेहमुक्त महाराष्ट्र’ हा प्रकल्प आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी जाहीर केला आहे. यासाठी डेन्मार्क देशाचे सहकार्य घेण्यात येणार आहे.