चन्नी झुकेगा नही!; ‘त्या’ कारवाईवरून काँग्रेसने सुनावला ’पुष्पा’चा डायलॉग!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांच्या नातेवाईकांच्या घरावर ईडीने छापे टाकल्यामुळे संतापलेल्या चन्नी यांनी फुल टू फिल्म स्टाईलने आपला संताप व्यक्त केला. आलू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटातील झुकेगा नही साला या संवादाचा वापर करत चन्नी झुकेगा नही… अशी पोस्टरबाजी चन्नी यांच्यावतीने करण्यात आली आहे. युथ काँग्रेसने चन्नी यांच्या बाजूने ट्विट करत ईडीचे छापे टाका किंवा खोटे आरोप करा. चन्नी वाकणार नाही. हे पंजाबचे सिंह आहेत, असे म्हटले आहे.