
बँकांमध्ये दैनंदिन व्यवहार करणाऱ्या ग्राहकांसाठी बँकने आपल्या नियमात बदल केले आहेत. त्यामुळे बँकामध्ये आता पैसे काढण्यासाठी आणि पैसे भरण्यासाठी शुल्क द्यावे लागणार आहे. याची सुरुवात बँक ऑफ बडोदाने 1 नोव्हेंबरपासून केली आहे.ठराविक मर्यादेपेक्षा अधिक रक्कम काढल्यास यापुढे ग्राहकांना शुल्क भरावे लागणार आहे.
लोन खात्यासाठी जे ग्राहक तीन वेळेपेक्षा अधिक रक्कम काढतील त्यांना 150 रुपये शुल्क दयावे लागणार आहे. तर बचत खात्यांमध्ये ग्राहकांना केवळ तीन वेळा पैसे जमा करता येतील परंतु चौथ्यांदा पैसे जमा करायचे असल्यास ग्राहकांना आता 40 रुपये मोजावे लागणार आहे.
बँक ऑफ बडोदा हे बदल बँकेचे करंट अकाऊंट, ओव्हरड्राफ्ट अकांऊंट, कॅश क्रेडिट अकांऊंट,सेव्हिंग्ज अकांऊंट आणि अन्य अकांऊंटससाठी कॅश जमा आणि पैसे काढण्याच्या सेवांशी संबंधित इतर खात्यांना लागू असणार आहेत.त्यामुळे आता ग्राहकांना 3 वेळेपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी शुल्क द्यावे लागणार आहे.
























































