
सामना ऑनलाईन, मुंबई
चतुरंग जीवनगौरव पुरस्कारार्थ होणारे रंगसंमेलन येत्या 15 आणि 15 डिसेंबरला रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी येथे पार पडणार आहे. सांस्कृतिक कार्यासाठी असलेला यंदाचा 28 जीवनगौरव पुरस्कार जागतिक कीर्तीचे चित्रकार सुहास बहुलकर यांना व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
दोन दिवसांच्या या सोहळयात साहित्य, नृत्य, नाटक, संगीत यांची पर्वणी रसिकांना मिळणार आहे. पूर्ण कार्यक्रमाच्या प्रवेशिका 9 डिसेंबरपासून ऑनलाइन आणि थिएटरवर उपलब्ध होतील. संमेलनाच्या देणगी प्रवेशिकांची आणि स्वागतयात्री योजनेची नोंदणी सुरू झाली असून गिरगाव कार्यालय- 23893282/ 23898376 वेळ सायंकाळी 5 ते 9 आणि डेंबिवली कार्यालय 0251- 2421242 या क्रमांकावर संपर्क साधावा.
- डॉ. भरत बलवल्ली यांची दीनानाथ नाटय़संगीत मैफिल, नकुल घाणेकर यांचा 40 कलाकारांसह कथ्थक संगे जलसा रंगे हा नृत्याविष्कार, – पंडित भवानी शंकर, पंडित मुकुंदराज देव, विद्वान शंकर नारायण, जयेश कथक यांचा तालवाद्याचा नादवैभव,
- ओम भूतकरची सुखन मैफिल, शि. द. फडणीस, विकास सबनीस, सुहास बहुलकर, रामदास फुटाणे यांची रंग-रेषांचे राजे- महाराजे ही प्रात्यक्षिकांसह चित्रसंवाद मुलाखत
- नाटय़संमेलनाची नवीन वहिवाट या अंतर्गत प्रसाद कांबळी, शरद पोंक्षे, मंगेश कदम आणि सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली मुलाखत






























































