स्वस्त आणि मस्त आहे ही 7 सिटर कार; देशभरात एक लाखांपेक्षा जास्त युनिटची विक्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुटुंबात जास्तजण असतील आणि बजेट कार घेण्याचे स्वप्न असेल अशा व्यक्तींसाठी एक स्वस्त आणि मस्त कार आहे. अशा व्यक्तींसाठी Renault Triber या 7 सिटर कारचा पर्याय चांगला ठरु शकतो. ही देशातील सर्वात स्वस्त 7 सिटर कार आहे. तसेच ही दिसायलाही चांगली आहे. तसेच या कारामध्ये अनेक फिचर्स आहेत. स्वस्त आणि मस्त कार असल्यानेच या कारची देशभरात एक लाखांपेक्षा जास्त युनिटची विक्री झाली आहे.

फ्रान्समधील वाहन केपनी रेनॉने हिंदुस्थानात जून 2019 मध्ये Renault Triber कार आणल्या होत्या. तेव्हापासून या 7 सिटर कारच्या 1 लाखांपेक्षा जास्त युनिटची विक्री झाली आहे. ही देशातील सर्वात स्वस्त 7 सिटर कार आहे. 7 सिटर कार असूनही याची किंमत 6 लाखांपेक्षा कमी आहे. या कारचे RXE, RXL, RXT आणि RXZ असे चार प्रकार उपलब्ध आहेत. याची एक्स शोरूममधील किंमत 5.76 लाखांपासून सुरू होते. कंपनीने याचे लिमिटेड एडिशन सादर केले आहे. याची एक्स शोरुम किंमत 7.24 लाख रुपये आहे. याचे बुकिंग या आठवड्यापासून सुरू झाली आहे.

सुरक्षेबाबत Renault Triber कारला जागतिक एनसीएपी क्रॅश टेस्टिंगमध्ये 4 स्टार रेटिंग मिळाली आहे. त्यामुळे स्वस्त आणि मस्त असण्यासोबत ही कार सुरक्षितही आहे. या कारमध्ये 1.0 पेट्रोल इंजिन आहे. तसेच नवीन लिमिटेड एडिशनसाठी एक्सटीरियर ड्युअल टोन कलर आहे. तसेच यात 14 इंचांचे फ्लेक्स व्हील आहेत. नवीन प्रकारात चार एअरबॅग देण्यात आल्या आहेत. दोन पुढे आणि दोन मागे अशी एअरबॅगची रचना आहे.