
सामना ऑनलाईन । सिडनी
इतिहास घडविण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरलेल्या ‘टीम इंडिया’ने चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यातील सलामीचा दिवस गाजवला. यजमान ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना निप्रभ ठरवत हिंदुस्थानने पहिल्या दिवशी 4 बाद 303 धावसंख्येपर्यंत मजल मारली. चेतेश्वर पुजाराने झळकावलेले नाबाद शतक आणि सलामीवीर मयांक अग्रवालची देखणी अर्धशतकी खेळी ही ‘टीम इंडिया’च्या गुरुवारच्या खेळाची वैशिष्टय़े ठरली. पुजाराने कारकीर्दीतील 18वे आणि मालिकेतील तिसरे शतक ठोकून सिडनीतही आपला दरारा दाखवून दिला. मयांकनेही वन डे स्टाइल फलंदाजी करून क्रिकेटशौकिनांची मने जिंकली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पुजारा 130 तर हनुमा विहारी 39 धावांवर खेळत होते.
कोहली-रहाणे फ्लॉप
मयांक अग्रवाल बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली व अजिंक्य रहाणे ही अनुभवी जोडीही फ्लॉप ठरली. कोहलीने चेतेश्वर पुजाराच्या साथीने तिसऱया गडय़ासाठी 54 धावांची भागीदारी केली. त्याने 59 चेंडूंत 4 चौकारांसह 23 धावांची खेळी केली. हेजलवूडच्या चेंडूला कट करण्याच्या नादात कोहली यष्टीमागे टीम पेनकरवी झेलबाद झाला. त्याच्या जागेवर आलेल्या अजिंक्य रहाणेलाही केवळ 18 धावा करता आल्या. पुजाराच्या साथीने त्याने चौथ्या गडय़ासाठी 48 धावांची भागीदारी केली.
डाव सावरला
लोकेश राहुल दुसऱयाच षटकांत बाद झाला तेव्हा धावफलकावर जेमतेम 10 धावा लागल्या होत्या. मात्र आलेला चेतेश्वर पुजारा आणि दुसरा आघाडीवीर मयांक अग्रवाल यांनी दुसऱया गडय़ासाठी 116 धावांची भागीदारी करून हिंदुस्थानचा डाव सावरला. पुजाराच्या तुलनेत मयांक अधिक आक्रमक खेळत होता. मयांकने 112 चेंडूंच्या खेळीत 77 धावा करताना 7 चौकारांसह 2 षटकारही ठोकले. चेंडूवर नजर बसलेली असताना नॅथन लायनला पुढे येऊन मैदानाबाहेर भिरकाविण्याच्या नादात त्याने सीमारेषेवर स्टार्ककडे झेल दिला. स्वतः विकेट फेकल्याने मयांकला शतकाने हुलकावणी दिली.
लोकेश राहुल पुन्हा अपयशी
रोहित शर्मा मायदेशी परतल्याने पुन्हा संधी मिळालेला लोकेश राहुल आणखी एकदा अपयशी ठरला. खरे तर लोकेशला आपले अपयश धुऊन काढण्याची संधी मिळाली होती, या सलामीवीराला जोश हेजलवूडने अवघ्या 9 धावांवर बाद करून तंबूत धाडले.
गावसकर, विराटच्या पंक्तीत पुजारा
ऑस्ट्रेलियाच्या भूमीत एका कसोटी मालिकेत तीन शतके झळकाकणारा पुजारा हा तिसरा हिंदुस्थानी फलंदाज ठरला. याबरोबरच पुजाराने दिग्गज कसोटीपटू आणि माजी कर्णधार सुनील गाकसकर व विद्यमान कर्णधार विराट कोहली यांच्या किक्रमाशी बरोबरी केली.
जोडी जमली
हनुमा विहारीनेही चेतेश्वर पुजाराला सुरेख साथ दिली. या दोघांनी पाचव्या गडय़ासाठी 75 धावांची अभेद्य भागीदारी करून हिंदुस्थानला तीशनेचा टप्पा ओलांडून दिला. पुजाराने नाबाद 130 धावांच्या खेळीत 250 चेंडूंना सामोरे जाताना 16 चेंडू सीमापार पाठवले. विहारीने 58 चेंडूंत 5 चौकारांच्या सहाय्याने आपली नाबाद 39 धावांची खेळी सजवली.
























































