छगन भुजबळ यांना कोरोना

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री, नाशिक जिह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन छगन भुजबळ यांनी सोमवारी ट्विटरद्वारे केले आहे. भुजबळ यांनी कालच प्रशासकीय अधिकारी आणि साहित्य संमेलनाचे पदाधिकारी यांची बैठक घेतली होती.

आपली प्रतिक्रिया द्या