गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांची १० मुले झाली फौजदार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संतोष भोसले । गेवराई

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्य सेवा पुर्व परिक्षेत गेवराई तालुक्यातील १० शेतकऱ्यांची मुले फौजदार झाली आहेत. या पदावर एवढ्या संख्येने जाण्याची ही पहीलीच वेळ असुन या तरुणांनी गेवराई तालुक्याचेच नाव महाराष्ट्राच्या नकाशावर कोरले आहे.

तालुक्यातील वसुदेव पवार (भेंड), अशोक माने (तलवाडा), श्याम वसंतराव वारंगे (मादळमोही), दिपक चव्हाण (जातेगाव), भरत बारगजे (वडगाव), अकुंश जाधव (कुभांरवाडी), विष्णु भांडवले (कुंभारवाडी), योगिता शकंर जंगले (भेंड), गणेश गिरी (खेर्डा) आणि सखाराम एकनाथ कांबळे (पोखरी) आदींची पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली. या निवडीबद्ल त्यांचे सर्वञ अभिनंदन होत आहे. ही सर्व मुले अत्यंत सामान्य कुटुंबातील असल्याचे समजते.