चीनला झाली चुकीची जाणीव, मागितली माफी

17170

चीनमधून संपूर्ण देशात पसरलेला कोरोना व्हायरसने सध्या जगभरात हाहाकार उडवला आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत तेरा हजार हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या व्हायरसची सर्व प्रथम माहिती देणारा चीनमधील डॉक्टर ली वेनलियांग यांच्या म्हणण्यावर चीनने दुर्लक्ष केले नसते तर ही महामारी एवढ्या मोठ्या प्रमाणात पसरली नसती. चीनला आता त्यांच्या चुकीची जाणीव झाली असून चीनकडून ली वेनलियांग यांच्या कुटुंबीयांची माफी मागण्यात आली आहे.

डिंसेंबर महिन्यात सर्वात पहिला कोरोनाची लक्षण दिसल्यानंतर वुहान शहरातील डॉक्टर वेनलियांग यांनी चीनला सावध करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी त्यांच्यावर अफवा पसरवत असल्याचा आरोप करत चीनमध्ये दंडात्मक कारवाई करण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसातच चीनमध्ये कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर या रोगाची लागण ली यांना देखील झाली व त्यात त्यांचा मृत्यू झाला. आता चीनमधील सत्ताधारी पक्ष कॉम्युनिस्ट पार्टीने ली यांच्या कुटुंबीयांची माफी मागितली आहे.

‘ली वेनलियांग यांनी दिलेली माहिती आम्ही गंभीरतेने घेतली असती तर हा हाहाकार उडाला नसता. आम्ही खूप मोठी चूक केली आहे. ली यांच्यावर कारवाई करणाऱ्या पोलीसांविरोधात कारवाई केली जाईल’ असे पक्षाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या