चीन संरक्षणावर 209 अब्ज डॉलर खर्च करणार!  आर्थिक संरक्षण तरतुदींत 6.8 टक्क्यांची वाढ

विस्तारवादी चीनने आपल्या संरक्षण बजेटमध्ये यंदा 6.8 टक्क्यांची वाढ करीत जगावर प्रभुत्व मिळवण्याचे आपले इरादे पुन्हा स्पष्ट केले आहेत. महासत्ता बनणाऱया चीनने आपल्या संरक्षण अर्थसंकल्पात 209 अब्ज डॉलर्सची तरतूद देशाच्या संरक्षणासाठी केली आहे. सलग सहा वर्षे ड्रगॉन आपल्या संरक्षण बजेटमध्ये वाढ करीत आहे.

शेजारी गरीब देशांना आपले मांडलिक बनवण्याची राक्षसी महत्त्वाकांक्षा बाळगणाऱया चीनने यंदाच्या संरक्षण तरतुदींतील वाढीचे समर्थन संभावितपणे केले आहे. चिनी पंतप्रधान ले केक्वियांग यांनी चीनच्या संसदेत हा बजेट सादर करताना असे सांगितले, चीनला आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी आपल्या संरक्षण खर्चात वाढ करावी लागत आहे. आम्हाला कुणाही शेजारी देशाला धमकावयाचे नाही की त्या देशावर आक्रमण करायचे नाही. त्यामुळे आमच्या संरक्षण बजेटमधील वाढीचा विपरीत अर्थ कुणीही लावू नये हीच मीडियाला विनंती आहे. गेल्या वर्षी चीनने आपल्या संरक्षण खर्चासाठी 1.268 खर्व युआन (सुमारे 196.44 अब्ज डॉलर ) इतकी तरतूद केली होती. त्यात यंदा आणखी वाढ होऊन ती 1.35 खर्व युआनवर (209 अब्ज डॉलर) पोहचली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या