इस्लामच्या चीनीकरनासाठी कायदा, समाजवादी मूल्यांचा होणार समावेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बीजींग

चीनमध्ये इस्लाम धर्माचे देशीकरन करण्यासाठी एक कायदा बनवण्यात आला आहे. या कायद्यानुसार पुढील पाच वर्षात इस्लाम धर्मात चीनी संस्कृतीच्या मूल्यांचा समावेश होईल. या कायद्यात इस्लामच्या ‘सिनिसायजेशन’ चा मुद्दा अधोरिखित करण्यात आला आहे. त्यानुसार कुठल्याही गोष्टीचा चीनीकरन करणे असा होतो. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार सरकारी अधिकार्‍यांनी 8 मुस्लिम संस्थांनी चर्चा करून हा कायदा बनवला आहे.

मुस्लिम धर्मात समाजवादी मूल्यांचा समावेश झाला पाहिजे आणि धर्माचे चीनीकरन झाले पाहिजे यावर सर्व अधिकार्‍यांचे एकमत झाले. अशी माहिती ग्लोबल टाईम्सच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे. परंतु मुस्लिम धर्माच्या चीनीकरनाची नेमकी प्रक्रिया कशी असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

चीन मधील शिनजियांत प्रांतातील उइगर मुस्लिमांवर बंदीनंतर हा कायदा बनवला गेला आहे. संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार १० लाख उइगर मुस्लिमांना कॅम्पमध्ये ठेवले असून त्यांना त्यांच्या धर्माचे पालन करण्यास बंदी आहे. तसेच चीनच्या अनेक प्रांतात मुस्लिम धर्म मानणे हे बेकायदेशीर आहे. या भागात रोजा ठेवणे, नमाज पढणे, दाढी वाढणे व हिजाब घालण्यावर बंदी असून असे केल्यास अटक केली जाते.