चीनच्या सरकारी वाहिनीवर पाकव्याप्त कश्मीर हा हिंदुस्थानचाच भाग, पाकडे नाराज

26

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

चीनची सरकारी वाहिनी असलेल्या सीजीटीएनवर CGTN पहिल्यांदाच पाकव्याप्त कश्मीर हा हिंदुस्थानचा भाग असल्याचा नकाशा दाखवण्यात आल्याने पाकिस्तान नाराज झाला आहे. गेल्या आठवड्यात पाकिस्तानमधील चीनी दूतावासावर हल्ला झाला होता. त्यावेळी सीजीटीएनवर हा नकाशा दाखवण्यात आला होता. यामुळे पाकिस्तानला झटका बसल्याचे वृत्त आहे.

हा नकाशा जाणूनबुजून दाखवला की चुकून, यावर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. चीन व हिंदुस्थान यांच्यात चर्चा सुरू असल्याने चीन हिंदु्स्थानपुढे झुकत असल्याचा संदेश पाकड्यांना देण्यासाठीही हा नकाशा वृतवाहिनीवर झळकवण्यात आला असावा असे तज्ज्ञांचे मत आहे. कारण याआधी कधीही असे चीनने केलेले नाही.

पाकव्याप्त कश्मीर हा हिंदुस्थानचा भाग असल्याचे दाखवण्यामागे चीन- पाकिस्तान कॉरिडोरचा मुद्दा असावा असेही बोलले जात आहे. कारण या कॉरिडोरच्या निर्मितीवर हिंदुस्थानने आक्षेप घेतला होता. त्यातच 10 डिसेंबर रोजी हिंदुस्थानी सैन्य व चीनचे सैन्य संयुक्त युद्ध सराव करणार आहेत. तर हिंदुस्थानमध्ये कर्तारपुर कॉरिडोरवरून वातावरण तापले आहे. दरम्यान याआधी कधीही असा नकाशा चीनची सरकारी वाहिनी असलेल्या सीजीटीएनवर CGTNवर दाखवण्यात आलेला नाही. यामुळे वरिष्ठांकडून हिरवा कंदील मिळाल्याशिवाय सरकारी वाहिनी असा नकाशा वापरू शकत नाही असे मत राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या