2022 मध्ये चीनच्या लोकसंख्येत मोठी घट; 1960 नंतर पहिल्यांदाच घसरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2022 मध्ये चीनची लोकसंख्या सहा दशकांनंतर प्रथमच कमी होऊ लागल्याचं पाहायला मिळत आहे. लोकसंख्येच्या संकटाशी सामना करत असलेल्या आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

नॅशनल स्टॅटिस्टिक्स ब्युरोने मंगळवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, चीनमध्ये गेल्या वर्षाच्या अखेरीस 1.41 अब्ज लोकसंख्या होती, जी 2021 च्या अखेरीपेक्षा 8,50,000 कमी आहे. माजी नेते माओ झेडोंग यांच्या नेतृत्वाखालील महादुष्काळाचा सामना करताना 1961 नंतर ही पहिली घसरण आहे.

चीनमध्ये 2022 मध्ये सुमारे 9.56 दशलक्ष बाळांचा जन्म झाला, एका वर्षापूर्वी हीच संख्या 10.62 दशलक्ष इतकी होती. 1950 नंतरची सर्वात कमी पातळी आहे, सरकारने कुटुंबांना अधिक मुले होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न केल्यानंतरही जन्मदर घटला आहे.

एकूण 10.41 दशलक्ष लोक मरण पावले, अलिकडच्या वर्षांत नोंदवलेल्या सुमारे 10 दशलक्षांपेक्षा किंचित वाढ दिसत आहे. डिसेंबरच्या सुरुवातीस चीनने विषाणूबाबत झिरो-कोविड धोरण मागे घेतले त्यानंतर गेल्या महिन्यापासून कोविड-संबंधित मृत्यूंमध्ये वाढ झाली. या वर्षी अधिक कोविड-संबंधित मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता मृत्यूंचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या उद्रेकामुळे यावर्षी मृत्यूची संख्या आणखी वाढू शकते.

लोकसंख्येतील घट पूर्वीच्या अपेक्षेपेक्षा खूप वेगाने आली आणि वस्तूंची मागणी कमी होत असून आर्थिक वाढीला ब्रेक लागण्याची भिती चीनला सतावत आहे. चीनची अर्थव्यवस्था आकाराने अमेरिकेला मागे टाकण्यात अपयशी ठरण्याची शक्यता तर आहे.

नुकतेच 2019 मध्ये, संयुक्त राष्ट्रांनी (UN) 2031 मध्ये चीनची लोकसंख्या शिखरावर जाईल आणि नंतर घटेल असा अंदाज वर्तवला होता, परंतु गेल्या वर्षी UN ने 2022 च्या सुरूवातीस त्या अंदाजात सुधारणा केली होती. चीनमध्ये श्रमिक शक्ती आधीच कमी होत आहे, घरांची मागणी आणखी कमी होण्याची शक्यता आहे, आणि सरकारला राष्ट्रीय पेन्शन प्रणालीसाठी पैसे देण्यातही चीनला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.