चायनीज लस घेतल्यानंतर इम्रान खान यांना कोरोना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे विशेष सहाय्यक फैसल सुल्तान यांनी शनिवारी ट्विट करून ही माहिती दिली. इम्रान यांनी दोन दिवसांपूर्वी ‘सायनोफार्म’ या चिनी कंपनीची लस घेतली होती. ही लस घेतल्यानंतर त्यांना कोरोना झाला आहे. कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर इम्रान यांनी स्वत:ला ‘होम क्कारंटाइन’ करून घेतले आहे. त्यांनी ज्या दिवशी लस घेतली होती, त्याच दिवशी त्यांच्यामध्ये कोरोना संसर्गाची लक्षणे दिसली होती. त्यांनी पहिला डोस घेतलेल्या ‘सायनोफार्म’ कंपनीच्या लसीचे तिसऱ्या टप्प्यातील निष्कर्ष अजून पुढे आलेले नाहीत. पाकिस्तानात कोरोना झपाट्याने फैलावला आहे. याचा धसका घेऊन इम्रान यांनी ही लस टोचून घेतली होती. मात्र या चायनीज लसीमुळे बचाव होण्याऐवजी विषाणूची लागण झाल्याने इम्रान यांची चिंता काढली आहे.