लडाख सीमेवर तैनात सैनिकांशी जिनपिंग यांनी साधला संवाद; युद्धाच्या तयारीचा घेतला आढावा

हिंदुस्थान-चीन सीमेवर लडाखमध्ये तैनात असलेल्या सैनिकांशी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी व्हिडिओ लिंकद्वारे संवाद साधला आहे. या संवादात त्यांनी सैनिकांकडून युद्धाच्या तयारीचा आढावा घेतला. त्यामुळे अडेलतट्टू चीनच्या मनात नेमके काय सुरू आहे, याबाबतचे प्रश्न उपस्थित होत आहेत. चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी याबाबतची माहिती दिली आहे.

पूर्व लडाख सीमेवरील दुर्गम स्थानांपैकी एक आहे. या भागात तापमान उणे 20 ते 30 अंशापर्यंत खाली येते. एवढ्या विपरीत वातावरणातही दोन्ही देशांचे सैनिक तैनात आहेत. चीन आणि हिंदुस्थानच्या सैनिकांमध्ये काही दिवसांपूर्वी संघर्ष झाला होता. त्यानंतर पहिल्यांदाच जिनपिंग यांनी सैनिकांशी संवाद साधला. सध्या सीमा भागात तणाव आहे. परिस्थिती सातत्याने बदलत आहे. सैनिकांनी प्रत्येक बदलासाठी तयार राहवे, असे आवाहन जिनपिंग यांनी केले. या संवादादरम्यान जिनपिंग यांनी युद्धाच्या तयारीचाही आढाव घेतला. सर्व सैन्य सतर्क असून कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याचे जिनपिंग यांना सैनिकांनी सांगितले.

या दुर्गम भागात आणि विपरीत वातावरणात सैनिकांना ताज्या भाज्या मिळत आहेत का, असा सवालही जिनपिंग यांनी केला. तसेच सीमाभागात सैनिकांची गस्त आणि सीमाभागातील तैनातीबाबतही त्यांनी माहिती घेतली. तसेच सानिकांनी नव्या जबाबदारीसाठी तयार राहवे, असे आवाहनही त्यांनी केले. सैनिकांनी सतर्क राहवे आणि राष्ट्रीय सुरक्षा आणि सामजिक स्थिरतेच्या रक्षणासाठी सज्ज राहावे, असे आवाहन केले आहे.

पूर्व लडाखमध्ये पेंगाँग सरोवराजवळ 5 मे 2020 हिंदुस्थानी आणि चीनी सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर सीमाभागत तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी 17 व्या स्तरावरील चर्चा सुरू आहे. दोन्ही देशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर जिनपिंग यांनी सैनिकांशी संवाद साधल्याने याला महत्त्व आले आहे.