
दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक प्रभू देवा हा सध्या त्याच्या खासगी आयुष्या मुळे चर्चेत आला आहे.
तो लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र त्याची होणारी पत्नी ही त्याची भाची असल्याची माहिती मिळत आहे.
झी न्यूज ने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपट सृष्टीत प्रभू देवा जितका सुपरहिट ठरला, तितकं त्याचं खासगी आयुष्य यशस्वी ठरलं नाही. त्याचा पहिला विवाह रामलता हिच्याशी झाला होता.
2011 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्या नंतर प्रभू देवाचं नाव नयनतारा या दाक्षिणात्य अभिनेत्रीशी जोडलं गेलं. मात्र, ते नातं फार काळ टिकू शकलं नाही.
अनेक अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडलं गेल्यानंतर आता त्याच्या विवाहाच्या चर्चांना उधाण आलं आहे. प्रभू देवा पुन्हा एकदा लग्न करणार असून त्याची भाची हीच त्याची होणारी पत्नी असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
अद्याप प्रभू देवा किंवा संबंधित कोणत्याही कुटुंबाकडून याची अधिकृत माहिती जारी करण्यात आलेली नाही.

























































