सर्कस नव्या ढंगात, खुल्या मैदानाऐवजी बंदिस्त सभागृहात खेळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाकाळातील ब्रेकनंतर पुन्हा एकदा सर्कशीतील विदुषकाच्या करामती आणि कलाकारांच्या चित्तथरारक कसरती मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. मात्र, सर्कशीचा खेळ तंबूऐवजी चक्क ऑडिटोरियममध्ये रंगणार आहे. असाच नवीन ढंगातील सर्कशीचा प्रयोग उद्यापासून वांद्रे येथे होणार आहे.

काळानुसार मनोरंजनाची माध्यमे बदलली तरी सर्कसची जादू आजही कायम आहे. हेच लक्षात 22 ते 24 जुलै या कालावधीत वांद्रे पूर्व येथील सेंट अँडय़्रूज ऑडिटोरियममध्ये रेम्बो सर्कस आयोजित करण्यात आली आहे. स्केटिंग, क्यूब जगलिंग, रोला बोला, हुला हूप आणि एरियल रोप असे एकापेक्षा एक भन्नाट प्रकार यावेळी कलाकार सादर करतील. याबाबत रेम्बो सर्कसचे सुजित दिलीप म्हणाले, पावसाळय़ात खुल्या मैदानात सर्कशीचा खेळ करण्यात अनेक अडचणी असतात. या काळात आम्हाला फारसे उत्पन्नदेखील मिळत नाही. त्यामुळे पहिल्यांदाच आम्ही बंदिस्त सभागृहात सर्कस आयोजित केली. पुढे ते म्हणाले,

20-25 वर्षांपूर्वी देशात सर्कशींची संख्या 200 च्या घरात होती, ती आता हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत आहे. सर्कशीची कला जिवंत ठेवण्यासाठी प्रेक्षकांची साथ महत्त्वाची आहे.