वर्गशिक्षिकेने केली मुख्याध्यापकांना बेदम मारहाण, गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील सरकारी शाळेत महिला शिक्षका वर्गातील विद्यार्थ्यांना मारहाण करत होती. या शिक्षिकेला मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना मारझोड करण्यास करण्यास नकार दिला. त्यामुळे वर्गशिक्षिकेने मुख्याध्यापकांनाच मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडियोही सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण बाराबंकीच्या देवा विकासखंड परिसरातील एका सरकारी शाळेत घडले. वर्गशिक्षिका विद्यार्थ्यांना वर्गात दररोज मारहाण करत असे. शनिवारी शिक्षिका विद्यार्थ्यांना मारझोड करत होती. त्याचवेळी शाळेत उपस्थित असलेल्या मुख्याध्यापिकेने शिक्षिकेला विद्यार्थ्यांना मारण्यापासून परावृत्त केले. यामुळे संतापाच्या भरात शिक्षिकेने मुलांसमोरच मुख्याध्यापिकेचा गळा दाबला. त्यानंतर तिने त्यांना थप्पड मारण्यास सुरुवात केली. त्यांचा गळा दाबला. बेदम मारहाणीमुळे मुख्याध्यापिका बेशुद्ध पडल्या. त्यानंतर वर्गशिक्षिका तिथून निघून गेली. इतर शिक्षिकांनी मुख्याध्यापकांना शुद्धिवर आणण्याचा प्रयत्न केला.

या घटनेनंतर मुले घाबरली. बेशुद्धावस्थेतून शुद्धिवर आलेल्या मुख्याधापिकांनी शिक्षिकेविरुद्ध पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढिल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले असून तपासात जी माहिती उघडकीस येईल, त्या आधारावर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा सोशल मिडियावर शेअर झालेला व्हिडियोही पोलिसांनी पाहिला असून त्यासंदर्भातही चौकशी सुरू आहे.