
सामना ऑनलाईन । मुंबई
भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू असून काँग्रेसच्या नेत्यांना भाजपमध्ये येण्यासाठी मुख्यमंत्र्याचाच फोन येत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. वृत्तवाहिन्यांशी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी हा आरोप केला.
शिवसेना-भाजपच्या महायुतीच्या लोकसभा निवडणुकीतील दणदणीत यशानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला आता विधानसभी निवडणुकांची चिंता वाटू लागली आहे. त्यावर बैठका सुरू आहेत. अशाच एका बैठकीनंतर अशोक चव्हाण म्हणाले की, मुख्यमंत्री काँग्रेस नेते, आमदारांना भाजपमध्ये येण्यासाठी फोन करत आहेत. अनेक आमदारांनी ही माहिती आपल्याला दिल्याचे कळते आहे.
आम्ही फोडाफोडी करत नाही- गिरीश महाजन
काँग्रेसचे आरोप राज्याचे जलसंपदा मंत्री यांनी फेटाळून लावले आहेत. काँग्रेसच्या आमदार, नेत्यांना भाजपकडून फोन जात नाहीत तर तेच आम्हाला पक्षात येण्याची इच्छा असल्याचे सांगतात, असे महाजन यांनी स्पष्ट केले आहे.





























































