मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले मोदी सरकारचे आभार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत अलीकडेच झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील 45 वर्षांवरील नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याची मागणी केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता, सर्वत्र लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी वयोगटाची अट शिथिल करणे गरजेचे आहे. विशेषतः 45 वर्षांवरील नागरिक कामासाठी बाहेर असतात. त्यांना प्रतिबंधक लस मिळणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसोबत झालेल्या व्हीसी मध्ये सांगितले होते. ही मागणी मान्य झाल्याने आता राज्यातील लसीकरणाला आणखी गती मिळणार आहे.

लसीकरणात महाराष्ट्र देशात अव्वल

कोरोना लसीकरणाच्या सुरुवातीच्या टप्प्यातही महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी होते. आतापर्यंत (दि. 22 मार्चच्या आकडेवारीनुसार) राज्यात 45 लाख 91 हजार 401 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.