
नरेंद्र मोदी यांच्या ‘अमृतकाल’मध्ये घोटाळय़ांचा सेल लागला असून अनेक घोटाळे उघड होत आहेत. केंद्र सरकारची एक नवरत्न कंपनी स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये झालेल्या 400 कोटींच्या घोटाळय़ाशी भाजपचा संबंध आहे. भाजपला देणगी देणारी कंपनी या घोटाळय़ात सहभागी आहे, असा आरोप काँग्रेसने आज केला.
माजी खासदार डॉ. अजोय कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन या घोटाळय़ाची सविस्तर माहिती दिली. देशातील पायाभूत सेवासुविधा प्रकल्पांना स्वस्तात स्टील पुरवण्याचा सेलचा नियम आहे. हा नियम धुडकावून कंपनीत कारभार सुरू होता. जवळपास 100 कंपन्यांनी तब्बल 11 लाख टन स्टील ‘सेल’कडून कवडीमोल भावाने खरेदी करून ते बाहेर विकले. यात भाजपला 30 कोटी रुपयांची देणगी देणाऱ्या ‘अॅप्को’ कंपनीचा सहभाग होता. या कंपनीला अनेक पायाभूत प्रकल्पांची कंत्राटे देण्यात आली. या कंपनीची कोणी साधी चौकशीही केली नाही. कंपनीच्या मालकावर किंवा अन्य कोणावरही कारवाई झाली नाही. नरेंद्र मोदी सरकारचा हाच खरा चेहरा आहे, असे अजोय कुमार म्हणाले.
तक्रार करणारा अधिकारीच निलंबित
राजीव भाटिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या घोटाळय़ाच्या संदर्भात दोन वेळा पत्रे लिहिली. घोटाळय़ात सहभागी असलेल्या लोकांची नावेही त्यांनी दिली होती. त्या पत्रांना उत्तरच आले नाही. शेवटी भाटिया यांनी केंद्रीय दक्षता आयोगाकडे तक्रार केल्यानंतर चौकशी सुरू झाली. चौकशीअंती 26 लोकांना निलंबित करण्यात आले. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना पुन्हा सामावून घेण्यात आले. उलट भाटिया यांनाच निलंबित करण्यात आले. त्यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आणि त्यांना व्हीआरएस घ्यायला लावली, असा आरोप अजोय कुमार यांनी केला.
1 तारखेला कंपनी स्थापली, 12 तारखेला कंत्राट
पत्रकार परिषदेत अजोय कुमार यांनी एका कंपनीचे नाव घेऊन घटनाक्रम सांगितला. वेंकटेश इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी 1 ऑक्टोबर 2020 रोजी स्थापन झाली. या कंपनीने 12 ऑक्टोबर 2020 रोजी दीड लाख टन स्टीलसाठी ‘सेल’सोबत करार केला. दहा दिवस आधी बनलेल्या कंपनीला 750 कोटींचे कंत्राट दिले गेले. वेंकटेश इन्फ्रा ही कंपनी चांगली आहे. आम्ही या कंपनीसोबत बरेच काम केले आहे, असे सांगणारे पत्र दुसऱ्याच एका कंपनीने सप्टेंबर महिन्यात ‘सेल’ला दिले, असे अजोय कुमार यांनी सांगितले.
खरेदी करून ते बाहेर विकले यात भाजपला 30 कोटी रुपयांची देणगी देणाऱया ‘अॅप्को’ कंपनीचा सहभाग होता. या कंपनीला अनेक पायाभूत प्रकल्पांची कंत्राटे देण्यात आली. या कंपनीची कोणी साधी चौकशीही केली नाही. कंपनीच्या मालकावर किंवा अन्य कोणावरही कारवाई झाली नाही. नरेंद्र मोदी सरकारचा हाच खरा चेहरा आहे, असे अजोय कुमार म्हणाले.
राजीव भाटिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या घोटाळय़ाच्या संदर्भात दोन वेळा पत्रे लिहिली. त्या पत्रांना उत्तरच आले नाही. शेवटी भाटिया यांनी केंद्रीय दक्षता आयोगाकडे तक्रार केल्यानंतर चौकशी सुरू झाली. चौकशीअंती 26 लोकांना निलंबित करण्यात आले. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना पुन्हा सामावून घेण्यात आले. उलट भाटिया यांनाच निलंबित करण्यात आले. त्यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आणि त्यांना व्हीआरएस घ्यायला लावली, असा आरोप अजोय कुमार यांनी केला.