सवर्ण आरक्षण हे निवडणुकीचा जुमला, काँग्रेसची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
abhishek-manu-singhavi

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली 

केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या वर्गाला 10 टक्के आरक्षण जाहीर केले आहे. हा निर्णय म्हणजे जुमला असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. पक्षाचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवीने ट्विट करून निवडणूकीपूर्वी घेतलेला हा निर्णय म्हणजे केवळ देखावा असल्याचे म्हटले आहे.

सिंघवींनी ट्विट करून म्हटले आही की, “मोदी सरकारने गेल्या साडे चार वर्षात हा विचार का नाही केला? आचार संहिता लागण्याचा बरोबर तीन महिन्यांपूर्वी हा निर्णय घेतला गेला म्हणजेच निवडणूका समोर ठेवून हा निर्णय घेतला आहे.” तसेच केंद्र सरकार 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देऊ शकत नाही, म्हणून सरकार फक्त हे दाखवू इच्छिते की आम्ही आरक्षणासाठी प्रयत्नशील आहोत.”

केंद्र सरकराने आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठी शिक्षणात आणि सरकारी नोकर्‍यांमध्ये १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.