सुरत: निवडणूक प्रक्रियेत अपात्र ठरवलेला काँग्रेस नेता ‘बेपत्ता’

सुरत काँग्रेसचे नेते नीलेश कुंभानी, ज्यांचं लोकसभेचं उमेदवार म्हणून नामांकन कथित विसंगतीमुळे नाकारण्यात आलं होतं, ते बेपत्ता आहेत आणि त्यांच्याशी फोनवर संपर्क होऊ शकत नाही, असं स्थानिक माध्यमांनी आज म्हटलं आहे. सर्व प्रतिस्पर्धी उमेदवारांनी स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर सूरतमधून भाजपचे मुकेश दलाल यांना विजयी घोषित केल्याच्या एका दिवसानंतर ही घटना घडली आहे.

कुंभानी भाजपमध्ये सहभागी होऊ शकतात असा दावा करणाऱ्या वृत्तांदरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या बंद घराबाहेर ‘जनता का गद्दार (जनतेचा गद्दार)’ असे पोस्टर घेऊन निषेध केला.

सुरतमध्ये भाजपचा पहिला लोकसभेत बिनविरोध विजय झाल्यानंतर नाट्यमय घटना घडत आहेत. गुजरात भाजपचे प्रमुख सीआर पाटील यांनी काल सांगितलं की, सुरतनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘पहिले कमळ’ अर्पण केलं आहे. ‘सुरत लोकसभा जागेचे आमचे उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध निवडून आल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो’, असं त्यांनी X वर एका पोस्टमध्ये म्हटलं आहे.

गुजरातमधील सत्ताधारी भाजपनं ‘चुकीचा आणि अयोग्य प्रभाव’ वापरल्याचा आरोप करत काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे आणि निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे.

‘म्हणून आम्ही निवडणूक आयोगाला सुरतमधील निवडणूक पुढे ढकलण्याची विनंती केली आहे आणि अशा चुकीच्या अनुचित प्रभावाचा तुम्ही फायदा घेऊ शकत नाही, असा स्पष्ट संदेश देण्यासाठी निवडणूक आयोगाला विनंती केली आहे’, असं पक्षाचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी काल निवडणूक आयुक्तांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांना सांगितलं.

सिंघवी यांनी असा दावा केला की सुरतमध्ये काँग्रेसचे उमेदवार कुंभानी यांना चार प्रस्तावकांनी नामनिर्देशित केलं होतं, ‘पण, अचानक चौघेही उभे राहिले आणि त्यांनी स्वाक्षरी नाकारली’.

‘हा योगायोग नाही. उमेदवार अनेक तास बेपत्ता आहे आणि तो पुन्हा समोर आला तोपर्यंत आम्हाला असे आढळून आले की प्रत्येक उमेदवाराने, त्यापैकी प्रत्येकाने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्याची उमेदवारी रिटर्निंग ऑफिसरने नाकारली आहे’, असं ते म्हणाले.