70 वर्षात जे जे काँग्रेसने निर्माण केलं ते भाजपने विकून टाकलं, राहुल गांधी यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या 70 वर्षात काँग्रेसने जे जे निर्माण केले ते भाजप सरकारने सात वर्षात विकून टाकलं अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच माध्यमांनी पंतप्रधान मोदींना कधीच प्रश्न विचारले नाही असेही गांधी म्हणाले.

काँग्रेस विद्यार्थी परिषदेच्या एका कार्यक्रमात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसने नेहमीच राष्ट्रनिर्मितीचे काम केले आहे. गेल्या 70 वर्षात जे जे उद्योग काँग्रेसने उभे केले होते, ते सर्व भाजपने केवळ सात वर्षात विकून टाकले. जेव्हा मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा मनमोहन सिंह एक दुबळे पंतप्रधान असल्याची टीका करण्यात आली, परंतु जेव्हा पुलवामावर हल्ला झाला तेव्हा माध्यमांनी त्यांना प्रश्न नाही विचारले असेही गांधी म्हणाले.