कोश्यारी यांना एक मिनिटही राज्यपालपदावर राहण्याचा अधिकार नाही – नाना पटोले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत आहे. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना गडकरी,पवारांशी केली. हे चूकच आहे. शिवरायांची तुलना कुणासोबतच होऊ शकत नाही. या आधी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबाबतही राज्यपालांनी वाईट विधान केलं आहे. शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे खपवून घेतलं जाणार नाही. तसेच भगतसिंह कोश्यारी यांना एक मिनिटही राज्यपाल पदावर राहण्याचा अधिकार नाही. असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचा निषेध केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्याबाबत केलेल्या विधानामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा सर्वस्तरातून निषेध होत आहे. तसेच भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाची पाचवेळा माफी मागितली असे विधान केले. यावर पाटोळे म्हणाले की महाराष्ट्रतील जनता तुम्हाला माफ करणार नाही. भाजपने महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा आम्ही तुम्हाला राज्यात फिरू देणार नाही, असा इशाराही यावेळी नाना पटोलेंनी दिला.