
सामना प्रतिनिधी । घनसावंगी
शिवसेनेच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण यावर विश्वास ठेवून शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ. हिकमत उढाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मोठ्या उत्साहात हा प्रवेश सोहळा झाला.
यावेळी माजी सभापती शालिकराम पवार, माजी सरपंच चत्रभुज काळे, बाबासाहेब पवार, संदिपान पवार, ज्ञानेश्वर पवार, विठ्ठल पवार, महादेव पवार, लक्ष्मण शेळके, गणेश पवार, गुलाबराव ढवळे, रमेश धाईत, अप्पासाहेब धाईत, गणेश पवार, काकासाहेब काळे, किशोर पवार, अप्पा पवार यांच्यासह दोनशे कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला आहे.
यावेळी शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले, तालुकाप्रमुख उद्धव मरकड, जिल्हा परिषद सदस्य अन्सीराम कंटुले, माजी जि.प.सदस्य बापूसाहेब देशमुख, पंचायत समिती गटनेते अनिरुध्द शिंदे, रमेश बोबडे, श्याम उढाण, युवासेना तालुकाप्रमुख सिद्धेश्वर उबाळे, दत्तात्रय बेद्रे, युवासेना संघटक संतोष जाधव, संदीप कंटुले,शहरप्रमुख अशोक शेलारे, दिगंबर उगले, विष्णू कोरडे, विनोद चव्हाण, मतीन शेख यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
































































