Video – प्रियंका गांधी यांनी हॉटेलमध्ये बनवले डोसे, व्हिडीओ झाला व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी या सध्या कर्नाटकात प्रचार सभा घेत आहेत. या सभांच्या निमित्ताने त्या मैसूर शहरात आल्या होत्या. तिथे त्यांनी प्रचारसभा घेतल्यानंतर लोकांमध्ये जात त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी प्रियंका गांधी एका डोसा सेंटरवरही गेलेल्या. तिथे त्यांना डोसा बनवण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी थेट त्या सेंटरच्या स्वयंपाकघरात जात डोसे बनवले. त्यांचा डोसे बनवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

येत्या 10 मे रोजी कर्नाटकात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे सध्या कर्नाटकात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. काँग्रेस, भाजप व जेडीएस या तिन्ही पक्षांकडून जोरदार प्रचारसभा घेतल्या जात आहेत.मैसूर येथे त्या प्रचारसभेला आलेल्या असताना त्यांनी प्रसिद्ध म्यालरी हॉटेलला भेट दिली. या वेळी त्यांनी हॉटेलच्या स्वयंपाकघरात जात डोसेही बनवले. त्याचा व्हिडीओ त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

प्रियंका गांधी यांच्यासोबत राज्याचे पक्ष प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला, केपीसी प्रमुख डीके शिवकुमार आणि काही नेतेही उपस्थित होते.