निवडणुक लढवण्यासाठी मोदी घेत आहेत इस्त्रायलची मदत, काँग्रेसचा खळबळजनक दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोंदींवर हल्ला चढवत गंभीर आरोप केले आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी नरेंद्र मोदी इस्त्रायली एजन्सीची मदत घेत असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसने केला आहे.

काँग्रेस पक्षाने दिल्ली येथील राष्ट्रीय कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसने नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते आणि पवन खेडा यांनी दावा केला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकशाहीशी खेळ करत आहेत, निवडणुक जिंकण्यासाठी इस्त्रायली एजन्सीची मदत घेत आहेत. पवन खेडा यांनी आरोप केला की, लोकशाही धोक्यात आहे, लोकशाही विरुद्ध सरकारमध्ये बसून इतर देशांना भेटून देशाविरोधात कट रचत आहेत.

काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते म्हणाल्या की, आंतरराष्ट्रीय पत्रकार समुहांनी दावा केला आहे की, इस्त्रायली कंत्राटदारांनी जगातील तीन निवडणुकांवर प्रभाव टाकला आहे. खोटी माहिती पसरवणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. हिंदुस्थानातही या एजन्सीचे पुरावे मिळालेले आहेत. असं सरकारच्या परवानगीशिवाय होऊ शकत नाही. त्यांनी सांगितले की, खोटे पसरवण्याची पद्धत भाजपच्या आय़टी सेलसारखी आहे. पुढे त्या म्हणाल्या की, भारत जोडो यात्रेदरम्यान भाजपच्या आयटी सेलने खोटी माहिती पसरवली होती की, पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणारी मुलगी राहुल गांधींना भेटली होती. याचप्रकारे राहुल गांधींच्या एका संभाषणाला चुकीच्या पद्धतीने उदयपूर हत्यांकांडाशी जोडले होते.

काँग्रेस प्रवक्त्यांनी आरोप केला आहे की, नागालॅण्डच्या विकासावर भाजपने केलेले मोठ मोठे दावे केवळ पोकळ आहेत. वास्तवतेशी पूर्णपणे वेगळे आहेत. ईशान्येकडील राज्य अजूनही व्यापक बेरोजगारी, चांगले रस्ते, वीज, पाणीपुरवठा यासाठी झुंजत आहेत.