
केंद्र सरकारकडून हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेची 7.8 टक्के जीडीपी वाढ झाल्याचे चित्र मांडले जात असतानाच, या आकडेवारीवरून काँग्रेसने गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. अर्थतज्ज्ञ आणि माजी केंद्रीय वित्त सचिव सुभाष चंद्र गर्ग यांच्या विश्लेषणाचा हवाला देत काँग्रेस नेते पवन खेरा यांनी हिंदुस्थानची वास्तविक जीडीपी वाढ तब्बल 5.2 टक्क्यांनी कमी, म्हणजेच केवळ 2.6 टक्के असल्याचा दावा केला आहे.
पवन खेरा यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये सुभाष गर्ग यांच्या विश्लेषणाचा संदर्भ देत केंद्र सरकारच्या जीडीपी वाढीच्या आकडेवारीवर टीका केली. “सुभाष गर्ग यांनी सरकारच्या 7.8 टक्के जीडीपी वाढीच्या मोठ्या दाव्याची पोलखोल केली आहे. त्यांच्या मते, हिंदुस्थानची वास्तविक जीडीपी वाढ सुमारे 2.6 टक्के इतकीच आहे,” असे खेरा यांनी पोस्टमध्ये म्हटले. सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशाच्या अर्थव्यवस्थेने मजबूत वाढ नोंदवली आहे. मात्र, या आकडेवारीच्या विश्लेषणावरून जीडीपी मोजण्याची पद्धत, महागाईचा परिणाम आणि वास्तविक आर्थिक वाढ याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने सरकारच्या अधिकृत आकडेवारीवर टीका केली आहे.
This man here has a passion for speaking a lot and making no sense. 465 words of bluster and deflection – without addressing Subhash Chandra Garg’s basic claim.
Let’s make this simple.
GDP growth is indeed 7.8% if you compare the revised Q1 figure of roughly ₹80 lakh crore… pic.twitter.com/UK28W1q8QF
— Pawan Khera 🇮🇳 ಪವನ್ ಖೇರಾ (@Pawankhera) September 2, 2026
सुभाष गर्ग यांच्या मांडणीचा आधार घेत काँग्रेसने अधिकृत जीडीपी वाढ आणि अर्थव्यवस्थेची वास्तविक वाढ यामध्ये मोठी तफावत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे 7.8 टक्के आणि 2.6 टक्के या दोन वेगवेगळ्या आकड्यांमुळे जीडीपीची गणना आणि त्यामागील पद्धत पुन्हा चर्चेत आली आहे. काँग्रेसने या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधत, सरकारकडून सादर केली जाणारी आर्थिक आकडेवारी आणि अर्थव्यवस्थेची प्रत्यक्ष स्थिती यामध्ये फरक असल्याचा आरोप केला आहे.



























































