तामिळनाडूत निर्माणाधीन इमारतीजवळ भूस्खलन, सहा मजूर ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तामिळनाडूच्या उटी परिसरातील लवडेल भागाममध्ये एका निर्माणाधीन इमारतीजवळ भुस्खलन झाल्याने एक मोठी दुर्घटना घडली. या भूस्खलनानंतर तेथे काम करणारे नऊ मजूर इमारतीच्या मलब्याखाली दबले गेले. या दुर्घटनेत सहा मजूरांचा मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये सहा महिलांचा समावेश आहे. एक मजूर अद्याप मलब्याखाली दबलेला असून त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन मजूर गंभीर जखमी असून त्यांना उटी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या भयंकर दुर्घटनेत सात मजूरांना आपला जीव गमवावा लागला आहे. सकिला (30), संगिता (35), भाग्या (36), उमा (35), मुथुलक्ष्मी (36) आणि राधा (38) अशी दुर्घटनेतील मृतांची नावे आहेत. एक मजूर बेपत्ता असून तो ढिगाऱ्याखाली असल्याची शक्यता आहे.