यजमान ब्राझीलची विजयी सलामी. वेनेझुएलावर 0-3ने मात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यजमान ब्राझीलच्या फुटबॉल संघाने सोमवारी पहाटे झालेल्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेतील पहिल्याच लढतीत वेनेझुएला संघाला 3-0 अशा फरकाने हरवले. ब्राझीलने या विजयासह तीन गुणांची कमाई करीत बी गटात पहिले स्थान पटकावले. याच गटातील अन्य लढतीत कोलंबियाने इक्वेडोरला 1-0ने हरवत तीन गुणांवर नाव कोरले आणि गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले.

आकडेवारीवर एक नजर

  • सहापैकी पाच कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेतील सलामीच्या लढतीत ब्राझीलने विजय मिळवलाय. एका स्पर्धेत या संघाला सलामीच्या लढतीत ‘ड्रॉ’वर समाधान मानावे लागले आहे.
  • ब्राझीलला कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत वेनेझुएलाविरुद्ध मागील नऊ लढतींमध्ये हार सहन करावी लागली नाही. नऊपैकी सात लढतींमध्ये ब्राझीलने विजय मिळवलाय. दोन लढतींमध्ये दोन संघांमध्ये बरोबरी झालीय.
  • मार्किनहोस याने या लढतीत गोल केला. त्याने आतापर्यंत ब्राझीलसाठी तीन लढतींमध्ये गोल केला आहे. या तिन्ही लढतींमध्ये ब्राझीलने विजय मिळवलाय हे विशेष. तसेच या तिन्ही लढतींमध्ये ब्राझीलविरुद्ध एकही गोल करण्यात आलेला नाही. या तिन्ही लढतींमध्ये ब्राझीलने विजय मिळवलाय हे विशेष. तसेच या तिन्ही लढतींमध्ये ब्राझीलविरूद्ध एकही गोल करण्यात आलेला नाही.

नेयमारचा पेनल्टीवर गोल

डिफेंडर मार्किनहोसने ब्राझीलसाठी पहिला गोल केला. त्याने 23व्या मिनिटाला ब्राझीलचे खाते उघडले. पूर्वार्धात त्यानंतर गोल करण्यात आला नाही. उत्तरार्धात नेयमारने 64व्या मिनिटाला पेनल्टीवर ब्राझीलसाठी दुसरा गोल केला.
हा त्याचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 67वा गोल ठरला. 89व्या मिनिटाला ग्रॅबियलने तिसरा गोल करीत ब्राझीलच्या शानदार विजयावर शिक्का मोर्तब केले.

ब्राझील-वेनेझुएला लढतीची आकडेवारी

  • ब्राझील वेनेझुएला
  • गोल 3 0
  • शॉट 18 3
  • शॉट ऑन टार्गेट 7 1
  • बॉलवरील ताबा 62 38
  • ऑफसाईड 2 2
  • कॉर्नर्स 9 4
  • यलो कार्ड 2 2
  • रेड कार्ड 0 ०