
अवघे जग कोरोना महामारीच्या संकटाशी झुंजत आहे. या संकटात अनेक देशांतील सेलिब्रेटी आपापल्या परीने मदतीचा हात देत आहेत. कुणी वैयक्तिकरीत्या तर पुणी निधी गोळा करून मदत करत आहेत. अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोन्स या दोघांनी मिळून 22 कोटींचा निधी उभा केला आहे. हा निधी फक्त हिंदुस्थानातील कोरोना लढाईसाठी वापरला जाणार आहे.
प्रियांकाने निधी संकलनाची माहिती स्वत: सोशल मीडियावरून दिली. प्रियांका-निकने ‘गिव्ह इंडिया’ या नावाने अभियान चालवून एवढी रक्कम जमवली. कोरानाच्या लढाईसाठी, गरजूंच्या मदतीसाठी हा संपूर्ण निधी वापरला जाणार आहे. या निधीचा योग्य उपयोग कसा आणि कुठे करायचा, याबाबत प्रियांकाने नुकतीचा गिव्ह इंडियाच्या सीईओंसोबत चर्चा केली आहे. त्यातून लवकरच गरजूंपर्यंत ही मदत पोहोचवण्याचे संकेत प्रियांकाने दिले आहेत.


























































