
Corona effect – देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. विविध राज्यांनी आपल्या सीमा सील केल्या आहेत. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले ईशान्येकडील मेघालय सारखे राज्य देखील आता पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे.
मेघालय सरकारकडून तसे परिपत्र जारी करण्यात आले आहे.तसेच संबंधित विभागांनी याचे काटेकोरपणे पालन करावे असे आदेश देखील देण्यात आले आहेत. त्यामुळे हिंदुस्थानातील आणखी एक राज्य हे पर्यटकांसाठी बंद झाले आहे.

























































