Corona effect – कोरोनाच्या दहशतीमुळे ‘या’ शहरात एकही गुन्हा नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा कहर सुरू असल्यामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यानुसार शहरातही नागरिकांनी घरीच बसने पसंत केले आहे. त्यामुळे शांतता प्रिय अशी ओळख असलेल्या पुणे शहराची प्रचिती आली आहे. कोरोनाच्या दराऱ्यामुळेनागरिक घरात आणि पोलीस रस्त्यावर असल्याने गुन्हेगारही गायब झाले आहेत. त्यामुळे मंगळवारी शहरात एकही गुन्हा दाखल नसल्याचे समोर आले आहे.

जगभरात कोरोनाने दशहत माजवली असून केंद्र सरकारने 21 दिवसांचे वस लॉकडाऊन जाहीर केले आहे. यामुळे सध्या सर्वांनाच घरी बसावे लागले आहे. दुसरीकडे पोलिसांना न जुमानता बेधडक गुन्हेगारी करणाऱ्या गुन्हेगारांनाही कोरोनाची दहशत आहे . मागील गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीत मोठी घट झाली आहे. गेल्या चार दिवसात किरकोळ तीन गुन्हे दाखल होत होते. मात्र, मंगळवारी शहरात एकही गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे गुन्हेगारही शांत बसून असल्याचे दिसून आले आहे. चौकट-अवैध धंदे सुरू असल्याचे कॉल कोरोनामुळे शहरात गुन्हेगारीत घट झाली असून एकही गुन्हा दाखल झाला नाही. मात्र, मंगळवारी दिवसभरात पोलिसांना विविध भागातून अवैध धंदे सुरू असल्याचे कॉल प्राप्त झाले आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर काहीच नसल्याचे दिसून आले आहे.

पोलीस आज नागरिक बाहेर पडणार नाहीत, यावर लक्ष ठेवत आहेत. सण, उत्सव, रॅली, शहर बंद, दंगल किंवा तत्सम घटना घडल्यानंतर पोलीस रस्त्यावर उभा राहुन सुरक्षा करतात. आजही या महामारीत सर्वांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उभा आहेत.