
मंगळूरूतून एक कोरोनाचा संशयित रुग्ण इस्पितळातून पळाला आहे. हा व्यक्ती दुबईतून हिंदुस्थानात आला होता. हा व्यक्ती कोरोना संक्रमित असल्याचा संशय आल्यानंतर त्याला इस्पितळात दाखल करण्यात आले होते.
रविवारी या व्यक्तीला ताप आला होता. तसेच कोरोनाचेही लक्षण दिसल्यामुळे त्याला मंगळूरूच्या वेनलॉक इस्पितळात दाखल करण्यात आले. तेव्हा त्याने इस्पितळातील कर्मचार्यांशी वाद घातला. तसेच आपल्याला कोरोनाची लागण झालीच नाही असा दावा त्याने केला आणि एका खासगी इस्पितळात आपण इलाज करू असे सांगून त्याने पळ काढला.
इस्पितळाच्या कर्मचार्यांनी पोलिसांना ही बाब कळवली. तेव्हा पोलिसांनी त्या भागात ऍलर्ट जारी करण्यात आला. जिल्हा आरोग्य विभागाने सोमवारी मंगळूरूत पोलिसांत तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.
जम्मू कश्मीरमध्येही कोरोना लागण झालेला एक रुग्ण फरार झाली होती. ही महिला रुग्ण इराणमधून परतली होती. या महिलेसोबत एक व्यक्तीही इस्पितळात दाख्ल होता. रविवारी दोघांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर ते पळून गेले होते. परंतु नंतर त्यांना पकडून परत इस्पितळात दाखल करण्यात आले.

























































