
मुंबईत सलग तीन दिवस सातशेपार झालेल्या कोरोना रुग्णसंख्येने आज थेट हजाराच्या आकडय़ाकडे वाटचाल केली. गेल्या 24 तासांत मुंबईत 889 नवे कोरोनाबाधित आढळले असून कोरोनामुळे एकाचा मृत्यूही झाला आहे.
मुंबईत करण्यात आलेल्या 10 हजार 257 चाचण्यांमध्ये हे कोरोनाबाधित आढळले आहेत. नव्या रुग्णांमधील 45 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील 3 जणांना ऑक्सिजनची गरज लागली. तर एकाच दिवसांत 329 जणांनी कोरोनावर मात केली. नव्या रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या 4 हजार 294 वर पोहोचली आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 1396 दिवसांपर्यंत खाली आला आहे.































































