कोरोना लसीकरण केंद्रातून संगणक चोरीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील कर्वेनगर परिसरात असलेल्या महानगर पालिकेच्या शाहू कॉलनी गल्लीतील शाळेत असलेल्या कोरोना लसीकरण केंद्रातून चोरट्यांनी 60 हजारांचा संगणक चोरून नेला आहे. ही घटना 23 ते 24 ऑगस्टला घडली असून याप्रकरणी समर्थ पवार (वय 20) यांनी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

फिर्यादी समर्थ पवार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या कोवीड लसीकरण केंद्राच्या नियोजनाचे काम करतात. कोवीडची लस नसल्यामुळे शाहू कॉलनीतील शाळेत असलेले लसीकरण बंद आहे. त्याची संधी साधून चोरट्यांनी शाळेतील खोलीचे कुलूप उचकटून 60 हजारांचा संगणक चोरून नेला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जे. एन. होळकर तपास करीत आहेत.