लसीकरण आता 24 तास; सोयीनुसार कधीही घेता येणार लस

1 मार्चपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी कोरोना लसीकरण सुरू झाले. सकाळी 9 ते दुपारी 3 ही वेळ त्यासाठी निश्चित करण्यात आली होती. ती वेळमर्यादा केंद्र सरकारने आज हटवली. आता नागरिकांना त्यांच्या सुविधेनुसार 24 तास कधीही लस घेता येणार आहे. त्याचप्रमाणे खासगी रुग्णालयांनाही कोरोना लस देण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

तिसऱया टप्प्यातील कोरोना लसीकरणाला गेल्या सोमवारपासून सुरुवात झाली. 60 वर्षांवरील व्यक्ती तसेच 45 वर्षांवरील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना या टप्प्यात लस दिली जात आहे. सरकारी व महानगरपालिका रुग्णालये, कोविड सेंटर्स येथे लस देण्यात येत होती. परंतु तिथे नागरिकांची प्रचंड गर्दी होऊ लागल्याने केंद्र सरकारला वेळमर्यादा हटवावी लागली.

आठवडय़ाचे सात दिवस आणि दिवसाचे 24 तास लसीकरण सुरू राहील असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज ट्विटरवरून सांगितले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत 1.54 कोटी नागरिकांना लस देण्यात आली आहे. मंगळवारी एका दिवसात 6,09,845 नागरिकांचे लसीकरण झाले.

आपली प्रतिक्रिया द्या