
मुंबईत कोरोनाचे सोमवारी 111 रुग्ण सापडले तर एकाचा मृत्यू झाला. 111 रुग्णांपैकी 100 जणांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. 11 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तर 6 जणांना ऑक्सिजन बेड देण्यात आला. 65 जण कोरोनामुक्त झाले तर सक्रिय रुग्णांची संख्या 907 कर पोहोचली आहे. राज्यात आज दिकसभरात 231 रुग्ण सापडले तर एकाचा मृत्यू झाला. 164 जण कोरोनामुक्त झाले तर सक्रिय रुग्णांची संख्या 2 हजार 432 कर पोहोचली आहे. दरम्यान, राज्यात 1 जानेवारी ते 10 ऑक्टोबरपर्यंत स्वाईन फ्लूचे 3 हजार 585 रुग्ण आढळले तर 204 जणांचा मृत्यू झाला.


























































