
कोरोनाला रोखण्यासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱया शिवडी टीबी रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा जाधव यांचा सोमवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. जाधव यांच्या जाण्याने वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
मुंबईत कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून त्या कोरोनाविरोधातील मोहिमेत सहभागी झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना न्यूमोनियाची लागण झाली. त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेचे कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत असून आतापर्यंत पालिकेच्या आरोग्य कर्मचारी, अधिकारी, कर्मचारी, कामगार अशा एकूण 201 जणांनी आपला जीव गमावला आहे.


























































