लॉकडाऊन; इयत्ता नववी, दहावी आणि अकरावीच्या परीक्षेचा निर्णय 15 एप्रिल नंतर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधिक

जगभरात झपाट्याने पसरत असलेल्या कोरोना व्हारसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशातच राज्यातील इयत्ता नववी, दहावी आणि अकरावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र याबाबतच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातील इयत्ता नववी, दहावी आणि अकरावीच्या परीक्षांबाबत 15 एप्रिल नंतर निर्णय घेण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाने दिली आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांची भोगोल विषयाची परीक्षा राहिली असून याबाबत 15 एप्रिल नंतर निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर लॉकडाऊन शिथिल झाल्यावर शिक्षकांना उत्तर पत्रिका तपासणीसाठी घरी घेऊन जाण्याची परवानगी मुख्याध्यापकांकडून दिली जाणार आहे, अशी माहितीही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाने दिली आहे.